SSC Result 2026 Saam Tv
महाराष्ट्र

SSC Result 2026 : धाराशिवच्या लेकीनं दहावीत मिळवले १०० पैकी १०० गुण, आता व्हायचंय डॉक्टर, वाचा यशोगाथा

Dharashiv Gayatri Patil Get 100 Percentage in SSC 2026 Result : दहावीचा निकाल लागला असून यामध्ये १७९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहे. यामध्ये उमरग्यातील गायत्री पाटीलनेदेखील पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.

Siddhi Hande

दहावीच्या परीक्षेत १७९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

उमरग्यातील गायत्री पाटील जिल्ह्यात आली पहिली

अभ्यासासोबत संगीताची आवड जोपासली

दहावीचा निकाल लागला आहे.यंदाच्या दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये १७९ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. दरम्यान, धाराशिवच्या गायत्री पाटीलला १०० पैकी १०० गुण मिळाले आहे. अभ्यासासोबत तिने आपल्या संगीताची आवड जपली आहे. उमरग्यातील लेकीने संपूर्ण गावाचे नाव मोठे केले आहे.

अभ्यासाला संगीताचा जोड

गायत्रीच्या या यशामुळे कुटुंबियंना खूप आनंद झाला आहे. गायत्रीचा गावकऱ्यांना अभिमान आहे. गायत्रीने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबियांना आणि शिक्षकांना दिले आहे. गायत्रीला भविष्यात डॉक्टर होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे

अभ्यासासाठी मेहनत सोबत संगीताची जोड देत धाराशिवच्या उमरगा येथील गायत्री पाटील हिने दहावीत १०० टक्के गुण घेत अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. तिने डॉ के डी इंग्लिश स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

गायत्रीला ५०० पैकी 492 गुण मिळाले. तसेच संगीताचे 8 गुण मिळून पाचशेपैकी पाचशे गुण मिळाले. त्यामुळे तिला १०० टक्के गुण मिळाले. ती सध्या नीटची तयारी करीत आहे. गायत्रीला डॉक्टर होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

गायत्री पाटीने याबाबत माहिती दिली आहे. 'सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मेहनतही घेतली आणि त्याचे फळ मला मिळाले. मी रोज सकाळी लवकर उठून अभ्यास करत होते. मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे', अशी प्रतिक्रिया शंभर टक्के गुण मिळवत उमरगा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गायत्री पाटील हिने व्यक्त केली. मुलीच्या यशाचा पाटील कुटुंबाकडून आनंद साजरा करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT