Manasvi Choudhary
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा असणार आहे.
आज दहावी परिक्षेचा निकाल लागणार आहे. सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार झाल्यानंतर १ वाजता निकाल लागेल.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत http://www.mahresult.nic.in,http://sscresult.mkcl.org या संकेतस्थळावर पाहू शकता.
एकाच वेळी असंख्य विद्यार्थी या संकेतस्थळावरून निकाल पाहत असतात यामुळे वेबसाईट हँग होऊ शकते.
वेबसाईट हँग झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीने निकाल पाहू शकता, ती सोपी पद्धत कोणती? हे लक्षात घ्या.
एक SMS पाठवून तुम्ही निकाल तपासू शकता. मोबाईलमध्ये मॅसेज अॅपमध्ये जाऊन तुम्हाला MHSSC टाईप करा
त्यानंतर तुमचा क्रमांक टाइप करावा लागेल आणि नंतर तयार केलेला मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुम्हाला काही मिनिटांतच निकाल पाहता येईल.