Manasvi Choudhary
आजकाल महिला व पुरूष स्किनकेअर करतात. चेहऱ्याची विशेष काळजी घेतात. कोरियन स्टाईल स्किनकेअर सध्या ट्रेंडमध्ये आहे. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी महिला अनेक उपाय करतात.
पार्लरमधील महागड्या उत्पादनांपेक्षा तुम्ही स्वयंपाकघरातील गोष्टींचा नैसर्गिकरित्या वापर करू शकता.
तांदळाचे पाणी हे चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. अनेकजण केसांसाठी देखील तांदळाचा पाण्याचा वापर करतात.
तांदळाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅटीऑक्सिडंट्स आणि अमिनो अॅसिड्सचे प्रमाण अधिक असते.
1) तांदळाचे पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो तसेच चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
2) तांदळाचे पाणी प्यायल्याने शरीराला आतून पोषण मिळते ज्यामुळे तुमची त्वचा देखील सुधारते.
3) तांदळाचे पाणी प्यायल्याने चेहऱ्याला नैसर्गिकरित्या पोषणतत्वे मिळतात. चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूमे, पिंपल्स, सुरकुत्या कमी होतात.
4) मुलांनी, प्रेग्नेट महिला तसेच ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे अश्या व्यक्तींनीं तांदळाचे पाणी पिण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.