Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गायत्री दातारने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे
गायत्रीने श्रीकांत चवरेबरोबर लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
लग्नानिमित या दोघांनाही अस्सल मराठमोळा लूक केला आहे. जो नेटकऱ्यांना फारच आवडला आहे.
पारंपारिक पद्धतीने या दोघांनीही लग्नगाठ बांधली आहे. दोघांनीही सुंदर लूक केला आहे. नवरी गायत्रीचा लूक विशेष लक्षवेधी ठरला आहे. तिने पारंपारिक मराठमोळी साडली नेसली आहे.
मेकअप, नाजूक दागिने आणि सौंदर्यावरचं हास्य हे सारं काही सांगून जात आहे. यातच लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे तिने घातलेलं मंगळसूत्र.
गायत्री दातारच्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नात गायत्रीने दोन वाट्याचे मंगळसूत्र घातले आहे. आधुनिक आणि पारंपारिक अश्या दोन्हीचं एकत्रिकरण त्यात दिसून येत आहे.
दोन वाट्याचे मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक आहे. दोन वाट्या म्हणजे 'शिव' आणि 'शक्ती' यांचे रूप मानले जाते, जे पती-पत्नीच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे.