SSC HSC Result Saam Tv
महाराष्ट्र

SSC HSC Result 2026: दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता; महत्त्वाची अपडेट आली समोर

SSC HSC Result 2026 Date May Postponed: दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे, त्यामुळे निकाल उशिरा लागू शकतो.

Siddhi Hande

दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता

बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निकाल उशिरा लागणार

बोर्डाकडून अजून अधिकृत माहिती समोर नाही

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर जाऊ शकतो. निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर (SSC HSC Result May Postponed)

राज्यात सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचाही यात समावेश होता. या आंदोलनाचा दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. हा निकाल लांबणीवर जाऊ शकतो.

बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परिक्षांचे निकाल लावण्याचं काम संध्या बंद आहे. शिक्षण मंडळाची बढती आणि बदली दोन वर्षांवरुन चार ते सहा वर्षांवर नेल्याने कर्मचारी संतप्त झाले आहे.त्यामुळे २८ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने विरोध दर्शवण्यात आला आहे. सध्या कर्मचाऱ्यांकडून राज्यातील नऊ विभागात लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरु आहे. त्यामुळेच याचा फटका थेट दहावी-बारावीच्या निकालावर होऊ शकतो. असं विठ्ठल सरोदे, उपाध्यक्ष, बोर्ड कर्मचारी महासंघटना यांनी सांगितले आहे. (10th-12th Result Delay Expected)

बारावीचा निकाल (12th Result Date) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता या आंदोलनामळे हा निकाल लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बोर्डाकडून अजून निकालाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT