

CBSE बोर्डाचा निकाल लागला
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार?
निकालाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहेत. दहावी-बारावीची परीक्षा होऊन आता महिना उलटून गेला आहे तरीही निकाल लागलेला नाही. पुढच्या महिन्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता एसएससी बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
CBSE बोर्डाचा निकाल लागला
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE Result 2026) निकाल हा परीक्षा झाल्यानंतर अवघ्या ३५ दिवसात निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा दुप्पट आहे तरीही त्यांचा निकाल ३५ दिवसात लागला. त्यानंतर आत एसएसई बोर्डाच्या निकालाच्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्य मंडळाच्या दहावीच्या (10th Result) परीक्षेसाठी राज्यातील एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थी बसले होते. दहावीची परीक्षा संपून २१ महिना झाला आहे. तरीही विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालेला नाही. याउलट सीबीएसई बोर्डाचा निकाल लवकर लागला आहे.
दहावीचा निकाल कधी लागणार? (SSC 10th Class Result Date)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर दोन आठवड्यात म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही दहावीचा निकाल लागू शकतो. दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच वेबसाइटवर लाइव्ह होतो. त्यामुळे तुम्ही लगेच वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.