Dhule Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Dhule Accident: धुळ्यात भरधाव ट्रकने वाहनांना तब्बल १ किलोमीटर फरफटत नेलं, अपघातात पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू

Dhule News: धुळ्यात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे एका भरधाव ट्रकने वाहनांना जोरदार धडक दिली. ज्यात एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

धुळे शहरात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथे एका भरधाव ट्रकने वाहनांना जोरदार धडक दिली. ज्यात एकाचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. भरधाव ट्रकने वाहनास जवळपास अर्धा ते एक किलोमीटर फरफटत नेलं, असं सांगण्यात येत आहे.

ट्रकचालकाने परिसरातील नागरिक पाठीमागे लागल्याने आणखी दोघांना उडवलं, असं सांगण्यात येत आहे. या अपघातात पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे, ज्यातील एक हा ट्रकचालक आहे.

वाशिममध्ये ऑटोची ट्रॅक्टरला धडक

दरम्यान, आज वाशिममध्येही आज एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. समोरून आडवा जाणाऱ्या ट्रॅक्टरला वेगात येत ऑटोने जोरदार धडक दिली. धडकेत ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून ऑटोतील चार मुलं किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना वाशिमच्या रिसोड शहरात घडली आहे. यात ऑटोचालकाचा बेजबाबदारपणा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

रुपेश अशोक सरकटे, असे ऑटोचालकाचे नाव असून तो अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आता त्याला पुढील उपचाराकरिता वाशिम येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT