solapur zilla parishad ceo manisha awhale admitted daughter in anganwadi school begins from today Saam Digital
महाराष्ट्र

School Chale Hum: आनंद गगनात मावेना! लेकीस अंगणवाडीत साेडण्यास आल्या सीईओ, कृतीतून दाखविला आदर्श

solapur zilla parishad ceo manisha awhale admitted daughter in anganwadi school begins from today : कन्येला साेडून परतताना आनंदित असलेल्या मनीषा आव्हाळे यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय जिल्हा परिषद घेत असल्याचे नमूद केले.

विश्वभूषण लिमये

जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझ्या व्यवस्थेवर माझा विश्वास अटळ आहे हे फक्त बोलण्यातून व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून व्यक्त व्हायला पाहिजे. त्यामुळेच आम्ही आमच्या कन्येचा अंगणवाडीत प्रवेश घेतला. आज शाळेच्या पहिला दिवस असल्याने कन्य ईशा हिला अंगणवाडीत साेडण्यास साेलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या आल्या हाेत्या. त्यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सर्वांसामन्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मनीषा आव्हाळे यांनी त्यांची कन्या ईशा हिचा सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर मधील अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला आहे. आज अंगणवाडीत पालक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी त्या आल्या हाेत्या. यावेळी आव्हाळेंनी पालकांनी अंगणवाडीचा पूरेपर उपयाेग करुन घेणे आवश्यक आहे. अंगणवाडीत कशा पद्धतीने मुलांना शिकवले जाते, सांभाळले जाते हे पालक सभेत निश्चित विचारावे. यामुळे आपल्याला देखील गाेष्टी लक्षात येतात.

दरम्यान,सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांनी आज शाळेत प्रवेश घेतला. मात्र त्यांना अद्याप ही गणवेश मिळालेला नाही. तो गणवेश लवकरच मिळेल असा विश्वास ही मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT