अंगणवाडीत 80 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्यास सेविका, मदतनीससह अधिका-यांवर हाेणार कारवाई : सीईओ वैभव वाघमारे

अंगणवाडी केंद्रातील मुलांशी संवाद साधून मुलांना अंकज्ञान, पक्षी, प्राणी, रंगज्ञान तसेच इतर बाबतीत त्यांनी प्रश्न विचारले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबतही त्यांनी संवाद साधला.
80 percent students attendance must in anganwadi
80 percent students attendance must in anganwadisaam tv
Published On

- मनोज जयस्वाल

Washim :

अंगणवाडी मध्ये विद्यार्थ्यांची 80 टक्के पेक्षा उपस्थिती कमी आढळल्यास संबंधित अंगणवाडी सेविका मदतनीस व संबंधित तालुक्याचे पर्यवेक्षकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असे निर्देश वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिले. (Maharashtra News)

मालेगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतीला आज वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र रंगरंगोटी करून बोलके करण्याबाबत वाघमारे यांनी निर्देश दिले.

80 percent students attendance must in anganwadi
I Stand With Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचे कार्य भाजपला झाेंबलं; 'आप'चे कल्याण, बुलढाणासह पिंपरी चिंचवडमध्ये आंदाेलन

अंगणवाडी केंद्रातील मुलांशी संवाद साधून मुलांना अंकज्ञान, पक्षी, प्राणी, रंगज्ञान तसेच इतर बाबतीत त्यांनी प्रश्न विचारले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबतही त्यांनी संवाद साधला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यादरम्यान त्यांनी अंगणवाडीचे आहार पाककृती आणि स्टॉकबुक व प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी केली. दैनिक उपस्थितीचे प्रमाण खूप कमी आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

80 percent students attendance must in anganwadi
Buldhana Lok Sabha Constituency : बुलढाणा लाेकसभा मतदारसंघ काॅंग्रेसला घ्या, पदाधिका-यांचा सामूहिक राजीनामा; नाना पटाेलेंवर दबाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com