Gopichand Padalkar  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, फिल्मी स्टाईल आले अन् उचलून नेलं; सोलापूरात खळबळ

Gopichand Padalkar: सोलापुरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपरहण करण्यात आले. अपहरण करून त्याची हत्या करण्याचा आरोपींचा कट होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला.

Priya More

Summary -

  • सोलापूरात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण

  • आरोपी अमित सुरवसे आणि सहा जणांनी केला हत्येचा प्रयत्न

  • पोलिसांच्या तत्परतेने काही तासांत सुटका.

  • जखमी कार्यकर्त्यावर रुग्णालयात उपचार सुरू.

सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी फिल्मी स्टाईल येत या कार्यकर्त्याला उचलून नेलं. या घटनेमुळे सोलापुरमध्ये खळबळ उडाली. कार्यकर्त्याच्या अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासांत आरोपींना शोधून काढत या कार्यकर्त्याची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली. तर अपरहण करण्यात आलेल्या जखमी कार्यकर्त्याला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे नाव आहे. तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अमित सुरवसेने आपल्या साथिदारांच्या मदतीने शरणुचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली.

गुरूवारी अमित सुरवसे आणि त्याच्या साथिदारांनी शरणु हांडेचे अपरहण केले. अपहरण करून शरणुची हत्या करण्याचा आरोपींचा कट होता. पण अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी शरणुच्या शोधासाठी ४ पथकं तयार केली आणि काही तासांच आरोपींना शोधून काढले. सोलापूर शहर पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचा जीव वाचला. रात्री १० वाजता पोलिसांनी आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. आरोपींनी केलेल्या मारहाणीत शरणु हांडे गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमित सुरवसेसह अन्य ६ आरोपीवर हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. सोलापुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून ते तपास करत आहेत. शरणु हांडेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोपीचंद पडळकर आज शरणु हांडेची भेट घेणार आहेत. तसंच ते पोलिसांची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro News : पुणेकरांना खुशखबर, गणेशोत्सावत मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत धावणार

Maharashtra Live News Update: हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी

Cholesterol myths: किचनमधील 'या' चुका वाढवतायत तुमचं कोलेस्ट्रॉल; मनात असलेले गैरमसज आजच काढून टाका

EPF Calculator: महिन्याला ₹५००० गुंतवा अन् ३.५ कोटींचा फंड मिळवा; वाचा नेमकं कॅल्क्युलेशन

Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai LIVE Updates: मोजक्याच गाड्यांना आझाद मैदानाकडे जाण्याची परवानगी

SCROLL FOR NEXT