Gopichand Padalkar Dance Video: सोनु निगम आणि श्रेया घोषालचा आवाज...; गोपीचंद पडळकरांचा रोमँटिक डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

Gopichand Padalkar Romantic Dance Video Viral: सोशल मीडियावर "मन भरून आलं…" हे गोपीचंद पडळकरांचा जुना म्यूझिक व्हिडीओ व्हायरल झाला. हे गाणं सहा वर्षांपूर्वी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे.
Gopichand Padalkar Romantic Dance Video Viral
Gopichand Padalkar Romantic Dance Video ViralSaam Tv
Published On

Gopichand Padalkar Romantic Dance Video Viral: 17 जुलै 2025 रोजी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या पायऱ्यांजवळ जोरदार मारहाण्याची घटना घडली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांवर धक्का देत एकमेकांना शिवीगाळी करत होते. परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसता सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. यामुळे एकच गदारोळ पसरला आहे.

या राजकीय गोंधळाच्या वेळीच, सोशल मीडियावर "मन भरून आलं…" हा जुना म्यूझिक व्हिडीओ व्हायरल झाला. हे गाणं सहा वर्षांपूर्वी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले असून, या म्यूझिक व्हिडीओमध्ये गोपीचंद पडळकर आणि साक्षी चौधरी रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर सामाजिक माध्यमांवर या व्हिडिओने जोरदार प्रतिसाद मिळाला.

Gopichand Padalkar Romantic Dance Video Viral
Renuka Shahane: मराठी भाषेच्या वादात रेणुका शहाणेंची एन्ट्री; म्हणाल्या,लोकांना कानाखाली मारणे...

"मन भरून आलं…" या रोमँटिक डान्स व्हिडीओमध्ये गोपिचंद पडळकरांचा हटके अंदाज पहायला मिळालाय. या व्हिडिओमध्ये साक्षी चौधरी हिने पडळकरांसोबत स्क्रीन शेअर केली असून या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Gopichand Padalkar Romantic Dance Video Viral
Saiyaara Public Review: अहान पांडे आणि अनित पड्डाचा 'सैयारा' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

या रोमँटिक डान्स व्हिडीओवर एक च नंबर साहेब, एकच छंद फक्त गोपीचंद, मला वाटतेय की पुढील दहा वर्षे हॉलीवुड, बॉलिवुड, कॉलीवुड ,टॉलीवुड नक्कीच गाजवणार् तसेच पुढचं दहा वर्षे ऑस्कर यांच्याच नावाने बुक राहणार अशा विविध प्रकारच्या विनोदी कमेंट येत आहेत. तसेत या व्हिडीओवर आतापर्यंत १० लाखांच्यावर लाईक्स आणि १० हजार कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com