Saiyaara Public Review: मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची चर्चा इतकी जोरदार आहे की, ऍडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाने सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाला मागे टाकले आहे. अनन्या पांडेचा चुलत भाऊ आणि चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडेने 'सैयारा' या चित्रपटातून पदार्पण केले आहे, हा चित्रपट १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत अनित पड्डा मुख्य भूमिकेत आहे. अहान आणि अनित यांची जोडी आणि कथेबद्दल प्रेक्षकांनी त्यांची प्रतिकिया येत आहे.
अहान पांडेचे कौतुक
चित्रपटात अहान पांडे आणि अनित पड्डा यांना खूप पसंती मिळत आहे. अहान आणि अनितच्या कामाने प्रेक्षक फार प्रभावी झाले आहेत. सोशल मिडीयावर अहानला, 'नॅशनल क्रश' बोलून त्याचे कौतुक केले जात आहे.
असा चित्रपट गेल्या १५ वर्षांत बनलेला नाही.
एका नेटकऱ्याने लिहिले की, "सैयारा हा एक उत्तम चित्रपट आहे, हा एक उत्तम प्रेमकथेचा चित्रपट आहे जो गेल्या १५ वर्षांत बनवला गेला नाही. या चित्रपटाची कथा अद्भुत आहे. पार्श्वसंगीत उत्तम आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही उत्कृष्ट आहे. सैयारा चित्रपट एक मोठा ब्लॉकबस्टर ठरेल."
अहान पांडेबद्दल बोलायचे झाले तर, हा डेब्यू त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा आहे. या चित्रपटाचे निर्माते अक्षय विधानी आहेत. 'सैयारा' चित्रपटाच्या गाण्यांचेही खूप कौतुक होत आहे, ज्यात फहीम अब्दुल्ला, तनिष्क बागची, अरसलान निजामी, सचेत-परंपरा, मिथुन, विशाल मिश्रा यांचे संगीत आहे. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, 'सैयारा' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून ९ ते १० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुमारे १५ कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे.