Singer Passed Away: प्रसिद्ध गायिका काळाच्या पडद्याआड; संगीतविश्वात शोककळा

Singer Passed Away: अमेरिकेच्या संगीत क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या कॉनी फ्रान्सिस यांचे १६ जुलै २०२५ रोजी निधन झाले.
Connie Francis
Connie Francis
Published On

Singer Passed Away: अमेरिकेच्या संगीत क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या कॉनी फ्रान्सिस (Connie Francis) यांचे १६ जुलै २०२५ रोजी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

कॉनी फ्रान्सिस यांनी १९५० आणि १९६० च्या दशकात आपल्या मधुर आवाजाने लाखो चाहत्यांची मने जिंकली. त्यांचे "प्रीटी लिटिल बेबी", "हू इज सॉरी नाऊ?", स्टुपिड क्यूपिट आणि "लिपस्टिक ऑन युअर कॉलर" ही गाणी आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहेत. त्यांच्या गाण्यांनी केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरातील श्रोत्यांवर गारूड केले.

Connie Francis
Bollywood Actress and Their Daughter: बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांची सुंदर लेकींना पाहिलेत का?

संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी २०० दशलक्षांहून अधिक रेकॉर्ड्स विकले, आणि त्या अमेरिकेतील सर्वाधिक यशस्वी महिला गायिकांपैकी एक ठरल्या. त्या केवळ गायिका नव्हत्या, तर संघर्षशील महिला होत्या. १९७४ मध्ये झालेल्या एका भीषण घटनेत त्यांच्यावर बलात्कार झाला होता, ज्यामुळे त्या खूप काळ गायनापासून दूर राहिल्या. मात्र नंतर त्यांनी हिम्मत दाखवत पुन्हा गायन क्षेत्रात पदार्पण केलं आणि लैंगिक अत्याचार पीडित महिलांसाठी आवाज उठवला.

Connie Francis
Bharti and Haarsh Love Story: टिव्हीवरील क्यूट कपल भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली?

कॉनी फ्रान्सिस यांची प्रकृती गेल्या काही आठवड्यांपासून खराब होती. त्यांना पेल्विक पेन (Pelvic Pain) मुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ४ जुलै रोजी त्यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून शेवटचं अपडेट देत "I’m doing better" असं लिहिलं होत. पण नंतर त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

२०२५ मध्ये त्यांचं "प्रीटी लिटिल बेबी" हे जुनं गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं. टिकटॉक आणि इन्टाग्राम रिलवर हे गाणं व्हायरल झालं आणि Spotify वर त्याला ७० दशलक्षांहून अधिक स्ट्रीम्स मिळाल्या. या लोकप्रियतेमुळे कॉनी यांचं नाव तरुण पिढीपर्यंत पुन्हा पोहोचलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com