Shruti Vilas Kadam
भारती आणि हर्ष यांची पहिली भेट कॉमेडी सर्कस या शोच्या सेटवर झाली. तेव्हा हर्ष लेखक होता आणि भारती परफॉर्मर.
शोदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. भारतीच्या विनोदी शैलीवर हर्ष लवकरच भाळला, आणि हळूहळू त्यांचे नाते घट्ट होत गेले.
भारती आणि हर्ष यांनी अनेक वर्षे आपले प्रेमसंबंध गुप्त ठेवले होते. २०१७ मध्ये त्यांनी सार्वजनिकरित्या साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.
३ डिसेंबर २०१७ रोजी गोव्यात भारती आणि हर्ष यांचे थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. या विवाहात अनेक टीव्ही कलाकार उपस्थित होते.
३ एप्रिल २०२२ रोजी भारती आणि हर्ष यांना एक गोंडस मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी लक्ष्य (Golla) ठेवले आहे. सोशल मीडियावर तो खूप लोकप्रिय आहे.
भारती आणि हर्ष अनेक रिअॅलिटी शोमध्ये एकत्र काम करतात – जसे की Khatra Khatra Show, Dance Deewane आणि इतर होस्टिंग प्रोजेक्ट्स.
भारती आणि हर्ष हे केवळ पती-पत्नी नाहीत, तर उत्तम सहकारी, मित्र आणि एकमेकांचे आधारस्तंभ आहेत. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांसाठी नेहमी प्रेरणादायक ठरते.