Shruti Vilas Kadam
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या ही लहान वयातच प्रसिद्धीझोतात आली आहे. ती अनेक सार्वजनिक कार्यक्रमात आईसोबत दिसते.
प्रियांका आणि निक यांची मुलगी मालती मेरी ३ वर्षांची असून सोशल मीडियावर त्यांचे प्रेमळ क्षण प्रचंड व्हायरल झाले आहेत .
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. २ नोव्हेंबर २०२२ रोजी आलिया आणि रणबीर यांना कन्यारत्न झाले.
सारा अली खान हिला बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख आहे. पण ती सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची कन्या आहे.
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने अजय देवगण आणि आमन देवगण यांच्यासोबत अभिषेक कपूरच्या आझादमधून पदार्पण करून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
भावना पांडे ही अभिनेत्री नसली तरी तिची मुलगी अनन्या बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आहे. आई-मुलीचे नाते सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो.
८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडियाची मुलगी ट्विंकल खन्ना हिने अभिनयानंतर लेखन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.