Jayant Patil On Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil News: 'असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा शेवटचा प्रयत्न', मंत्रिमंडळ विस्तारावरुन जयंत पाटलांचा महायुतीला टोला!

Jayant Patil On Maratha Reservation: चर्चा आणि मुदत वाढीचा गुराळ सरकार किती महिने चालू ठेवणार? असा सवाल करत जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुनही राज्य सरकारला खडेबोल सुनावले.

विश्वभूषण लिमये

सोलापूर, ता. १८ जुलै २०२४

अतिक्रमण हटवण्यावरुन झालेल्या वादानंतर विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली. या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विशाळगडावरील घटना हे राज्य सरकारचे अपयश असल्याचा आरोप करत अशाने राज्यात अराजकता माजेल असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. सोलापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील?

"विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. पायथ्याला असलेल्या लोकांना वरती जाऊ न दिल्याने त्यांनी तेथील धार्मिक स्थळावर हल्ला केला. तेथील लोकांची घरदारं फोडून, तिजोऱ्या लुटून त्यातील संपत्ती नेली. हे शिवप्रेमींचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठूनतरी वेगळ्या ठिकाणावरून आलेले गुंड आहेत. अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे सरकारचे हे मोठं फेल्युअर आहे," असं जयंत पाटील म्हणाले.

मंत्रीमंडळ विस्तारावरुन टोला!

"परत मंत्रिमंडळाचा विस्तार आता होणार नाही, ही शेवटची संधी आहे असं काही आमदारांना वाटते. आमच्या मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने तरी पूर्ण होऊ दे असे बरेच आमदार मागे लागले. काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे, कारण परत सरकार येईल याची खात्री नाही. सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोड्या दिवसासाठी तरी मंत्री करा असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे," असे म्हणत मंत्रीमंडळ विस्तारावरुन जयंत पाटील यांनी महायुतीला टोला लगावला.

मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला सवाल!

तसेच "मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाशी तर उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाशी संवाद साधून त्यांना काय आश्वासन दिले हे माहिती नाही. यावर सरकारने बऱ्याच चर्चा केलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने या निर्णयापर्यंत यायला हवं. सरकार निर्णय घेण्यात सक्षम आहे. त्यांनी विरोधकांना बोलावून याबाबत काय निर्णय घेतला हे सांगितले पाहिजे. चर्चा आणि मुदत वाढीचा गुराळ सरकार किती महिने चालू ठेवणार?" असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT