पिंपरी चिंचवड|ता. १८ जुलै २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पक्षाला मोठा धक्का बसला असून पिंपरी चिंचवड शहराध्यक्षांसह काल अनेक नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. विधानसभेआधी शरद पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर अजित पवारांसमोर डॅमेज कंट्रोल रोखण्याचे मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्यानंतर अजित पवारांनी आज पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये आपल्या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे देखील हा बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पक्षाच्या नव्या शहर अध्यक्षपदासाठी नाव द्यायला सांगितले आहे. तसेच आजी माजी नगरसेवक अजून आमच्याकडे आहेत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असून २१ जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीची जबाबदारी माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे देण्यात आली असून यावेळी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विधान परिषद, मंत्री मंडळ विस्तार, तसेच महामंडळावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच लवकरच नवे शहराध्यक्ष निवडले जाणार असून माजी उपमहापौर राजू मिसाळ, आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यापैकी एका नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.