विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर
राज्यात विधानसभा निवडणुकीचं पुढील महिन्यात बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच मात्र राजकीय पक्षांमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या जागेंवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मतदार संघावर दावा केला जातोय. त्यामुळे माढाच्या जागेवरून विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीत बिघाडी होणार का, असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत (Madha Assembly constituency) आहे.
माढा विधानसभा मतदारसंघ
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माजी आमदार धनाजी साठे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आहे. मीनल साठे या सध्या माढा नगरपंचायत नगराध्यक्षा आहेत. त्यांना माढा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केलीय. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून माढा मतदारसंघातून जनसंवाद यात्रा देखील काढण्यात येणार असल्याची माहिती (Congress Vs Sharad Pawar Group) मिळतेय.
काँग्रेस- शरद पवार गटात रस्सीखेच
माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. महाविकास आघाडीकडून माढा विधानसभा मतदारसंघातून मीनल साठे यांना उमेदवारी द्यावी, अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी (Solapur News) केलीय. माढा विधानसभा संघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीतील वातावरण तापण्याची शक्यता
महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात माढ्यात राडा होण्याची चिन्ह दिसत आहेत. माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबन शिंदे आमदार आहेत (Vidhan Sabha Election) आहेत. मात्र, नुकतंच बबन शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माढ्यावरून महाविकास आघाडीतील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.