Madha Loksabha Result: पवारांचा डाव भाजपवर भारी! माढ्यात तुतारी वाजली; धैर्यशिल मोहिते पाटलांचा दणदणीत विजय

Madha Loksabha Constituency Result Ranjitsinh Naik Nimbalkar Vs Dhairyashil Mohite Patil: नाट्यमय घडामोडींमुळे राज्याच्या लोकसभा निवडणुकांमध्ये माढा लोकसभा मतदार संघ चर्चेत राहिला. धैर्यशिल मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये झालेल्या या लढतीत कोणी बाजी मारली? याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Madha Loksabha Result: पवारांचा डाव भाजपवर भारी! माढ्यात कमळ कोमेजले; धैर्यशिल मोहिते पाटलांचा दणदणीत विजय
Madha Lok Sabha Election Candidate Dhairyashil Mohite Patil Vs Ranjeetsinh Naik NimbalkarSaam TV

माढा, ता. ४ जून २०२४

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांची मतमोजणी सुरू असून अनेक जागांवरील अंतिम निकाल समोर येत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघात शरद पवार यांची तुतारी जोरात वाजणार की रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा बाजी मारणार याबाबतचा अंतिम निकाल समोर आला आहे. माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशिल मोहिते पाटील यांनी विजय मिळवत गुलाल उधलला आहे.

माढ्याच्या लढतीचा निकाल

पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदार संघ अनेक राजकीय घडीमोडींमुळे चांगलाच चर्चेत आला होता. माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशिल मोहिते पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत धैर्यशिल मोहिते पाटील यांनी बाजी मारली आहे.

मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून माढा मतदार संघ चर्चेत आला होता. माढ्यातून भारतीय जनता पक्षाने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी दिल्याने अकलूजचे मोहिते पाटील कुटुंब नाराज होते. हिच नाराजी हेरत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना गळाला लावण्याचा यशस्वी डाव टाकला.

Madha Loksabha Result: पवारांचा डाव भाजपवर भारी! माढ्यात कमळ कोमेजले; धैर्यशिल मोहिते पाटलांचा दणदणीत विजय
Arun Gawli News: चुकीला माफी नाहीचं! डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका; मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयाला स्थगिती

सुरूवातीला एकतर्फी मानल्या जाणाऱ्या या लढतीत शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरी रंगत निर्माण झाली. रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सभा झाली होती.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवारांचे शिलेदा धैर्यशिल मोहिते पाटील यांना भाजपचेच उत्तम जानकर, तसेच फलटणचे निंबाळकर यांनी साथ दिल्याने या लढतीत त्यांचीही ताकद वाढल्याचे दिसत होते. अखेर या चर्चित लढतीत मोहिते पाटलांनी यांनी बाजी मारुन सर्वांनाच धक्का दिला आहे.

Madha Loksabha Result: पवारांचा डाव भाजपवर भारी! माढ्यात कमळ कोमेजले; धैर्यशिल मोहिते पाटलांचा दणदणीत विजय
Nashik News: विखे पाटलांची एन्ट्री, शुभांगी पाटीलही बंडखोरीच्या तयारीत; नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रंगणार चढाओढ!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com