Corona New Variant Saam tv
महाराष्ट्र

Corona New Variant : कोरोना नवा व्हेरिएंट, अक्कलकोट अलर्ट मोडवर; भाविकांना मास्कचे वाटप

Solapur News : स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे- मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : कोरोनाच्या जेएन १ या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण भारतात आढळून येत आहेत. या दरम्यान (Solapur) राज्यातील सांगली जिल्ह्यात देखील नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्यानं अक्कलकोट प्रशासन अलर्ट (Corona) झाले असून येथे येणाऱ्या भाविकांना मास्कचे वाटप केले जात आहे. (Maharashtra News)

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाचा जेएन १ हा नवा व्हेरिएंटचा (Corona New Varient) प्रसार झपाट्याने होत आहे. राज्यात देखील याचे रुग्ण आढळून येत आहेत. याचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने अक्कलकोट येथील स्वामी समर्थ देवस्थानमधील यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. दरम्यान, दररोज स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे- मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाविकांना मास्क वाटप 

शासन निर्देशानुसार कोरोनाच्या जेएन १ या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये, यासाठी वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान समितीतर्फे स्वामी भक्तांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. राज्यासह देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांनी काळजी घ्यावी; असे आवाहन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

SCROLL FOR NEXT