Solapur News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News: धक्कादायक! नाल्यात फेकून दिलं नवजात अर्भक; सोलापूरमधील घटना

Solapur News: सोलापूरमध्ये रुपभवानी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवजात अर्भकाचे लचके तोडले आहेत.

Siddhi Hande

सोलापूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे सोलापूरमध्ये एका नवजात अर्भकाचे लचके तोडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे सोलापूरमध्ये नेहमी वर्दळ असणाऱ्या रुपाभवानी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकराने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सोलापूरमधील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रुपभवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीच्या अर्भकाला फेकून दिले होते. या अर्भकाचे लचके तोडले आहेत. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परसली. बातमी पसरताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. घटनास्थळी पोलिस पाहणी करत आहेत. (Solapur)

दरम्यान, सदर प्रकारात अनैतिक संबंधातून किंवा अन्य कारणाने अर्भकाला टाकून दिले असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. पोलिसांना मृत अर्भक शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur News)

पुण्यातही नवजात बाळाला रस्त्यावर फेकले

पुण्यात नवजात बाळाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना काल घडली. वडगाव बुद्रुकमध्ये ही घटना घडली होती. बाळाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला पिशवी बांधण्यात आली होती. नवजात बाळाला रस्त्यावर सोडून दिले. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

महायुतीत 'चेकमेट'चं राजकारण, 2029 साठी आत्तापासूनच शह-काटशह

SCROLL FOR NEXT