Surabhi Jayashree Jagdish
महाभारताच्या युद्धापूर्वी श्रीकृष्णांनी दोन्ही पक्षांना एक पर्याय दिला होता. एका बाजूला त्यांची नारायणी सेना आणि दुसऱ्या बाजूला स्वतः श्रीकृष्ण, मात्र ते शस्त्र उचलणार नाहीत. अर्जुनाने श्रीकृष्णांची निवड केली, तर दुर्योधनाने त्यांची सेना स्वीकारली.
श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने होते पण त्यांनी स्वतः शस्त्र घेऊन कौरवांशी लढण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यांचा मुख्य उद्देश अर्जुनाला योग्य निर्णय घेण्यास मार्गदर्शन करणं हा होता. भगवद्गीतेतील श्रीकृष्णांचं अर्जुनाला दिलेले उपदेश याच भूमिकेचा महत्त्वाचा भाग आहेत.
श्रीकृष्णांनी हातात शस्त्र घेण्याऐवजी अर्जुनाच्या रथाची धुरा स्वीकारली. यामुळे युद्धातील त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव कमी झाला नाही, कारण ते अर्जुनाला रणभूमीवर सतत मार्गदर्शन करत होते.
युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत भीष्म पांडवांच्या सैन्यावर हल्ले करत होते. अर्जुनाला भीष्मांविरुद्ध पूर्ण ताकदीने लढताना संकोच वाटत असल्याचं महाभारतातील कथानकात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे एका प्रसंगी श्रीकृष्ण अत्यंत संतप्त झाले आणि त्यांनी रथातून उतरून भीष्मांकडे धाव घेतली.
या प्रसंगात श्रीकृष्णांनी रथाचं चाक उचललं आणि भीष्मांकडे धाव घेतली त्यामुळे त्यांची शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा मोडण्याची वेळ आली होती. भीष्मांनीही श्रीकृष्णांना पाहून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्याकडून मृत्यू मिळणं हे आपल्यासाठी गौरवाचं मानलं. मात्र अर्जुनाने श्रीकृष्णांना थांबवले आणि स्वतः भीष्मांशी युद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली.
या माहितीसाठी महाभारताच्या भीष्मपर्वातील कृष्ण-अर्जुन-भीष्म युद्धप्रसंग आणि उद्योगपर्वातील युद्धपूर्व घडामोडी हे प्रमुख संदर्भ घेतले आहेत.
या बातमीमध्ये गरुड पुराणातील प्रेतखंड तसेच हिंदू धार्मिक परंपरेत आढळणाऱ्या वर्णनांच्या आधारे मृत्यूनंतर आत्म्याची अवस्था, पुढील शरीर आणि पुनर्जन्मासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यातील उल्लेख हे धार्मिक ग्रंथ व श्रद्धांवर आधारित असून, त्यांना वैज्ञानिक तथ्य किंवा सिद्ध झालेले सत्य म्हणून घेऊ नये.