Ulhasnagar Crime News : नवजात बाळ विक्री प्रकरण; नर्सिंग होमच्या महिला डॉक्टरसह पाच अटकेत

Dr. Chitra Chainani News : आज सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
mahalaxmi nursing home ulhasnagar, Ulhasnagar Crime News
mahalaxmi nursing home ulhasnagar, Ulhasnagar Crime Newssaam tv

Ulhasnagar News : उल्हासनगर येथे नवजात बाळाची विक्री करण्याच्या उद्देशाने घडलेल्या घटनेत पाेलीसांनी पाच जणांना अटक (ulhasnagar police arrests five along with doctro in new born baby case) केली आहे. यामध्ये शहरातील महालक्ष्मी नर्सिंग होम (mahalaxmi nursing home ulhasnagar) येथील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यासह तिघा महिलांना तसेच एक पुरुषाचा समावेश आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड (madhukar kad) यांनी दिली. (Maharashtra News)

mahalaxmi nursing home ulhasnagar, Ulhasnagar Crime News
Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड म्हणाले 17 मे राेजी महालक्ष्मी नर्सिंग होम येथे एक महिला बाळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिटच्या अधिका-यांना मिळाली हाेती. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने महालक्ष्मी नर्सिंग होम येथे छापा टाकला. तेथे वैद्यकीय अधिका-यांची चाैकशी करुन त्यांना ताब्यात घेतलं.

mahalaxmi nursing home ulhasnagar, Ulhasnagar Crime News
Devendra Fadnavis News : शेतक-यांना दिलासा ! पीक कर्जासाठी Cibil Score मागणा-या बँकांवर गुन्हा दाखल हाेणार (पाहा व्हिडिओ)

या प्रकरणात डॉ. चित्रा चैनानी (Dr. Chitra Chainani) हिच्यासह तीन महिला आणि एक पुरुषाला अटक करण्यात आली आहे. आज संशयित पाचही आराेपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com