water tank Saam tv
महाराष्ट्र

Solapur Water Supply: सात दिवसांत १२५ टँकर बंद; अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील ७८ गावे तहानलेलीच

Solapur Water Problem: यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भाषण टंचाई जाणवत होती. टंचाई निवारण्यासाठी गावांमध्ये टँकर सुरु करण्यात आले होते.

विश्वभुषण लिमये

सोलापूर : उन्हाळ्याची दाहकता वाढत असतानाच मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. रोहिणी आणि मृग नक्षत्रात सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गावागावांतील पाण्याची टंचाई आटोक्यात आली आहे. दरम्यान, मागील सात दिवसांत जिल्ह्यातील १२५ टैंकर बंद करण्यात आले आहेत. मात्र आजही ९९ टँकर ७८ गावे, ६२८ वाड्या वस्त्यांवर सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भाषण टंचाई जाणवत होती. टंचाई निवारण्यासाठी गावांमध्ये टँकर सुरु करण्यात आले होते. दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात (Solapur) पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मान्सून दाखल होताच दमदार पाऊस पडला. या पावसाने ओढे, नाले, पाझर तलावाला पाणी आले आहे. यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय बोअर, विहिरींना पाणी वाढले आहे. पंढरपूर, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट भागात चांगला पाऊस पडला आहे. चांगला पाऊस पडल्याने पाण्याची सोय झाल्याने टँकर बंद करण्यात आल्याच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आल आहे.

तरीही ७८ गावात पाण्याची झळ कायम 
जुलै महिन्यात पुन्हा चांगला (Rain) पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे जुलैअखेर जिल्ह्यातील टँकर संख्या शून्यावर येईल आणि जिल्हा टँकरमुक्त होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात जूनअखेर ७८ गावांत पाणी टंचाईची झळ अजूनही कायम आहे. ७८ गावे, ६२८ वाड्यांवरील २ लाख ३४ हजार ९३६ लोकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक टँकर करमाळा, मंगळवेढा, सांगोला तालुक्यात सुरू असून सर्वात कमी माढा, अक्कलकोट,बार्शी येथे सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT