Nashik News  Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू; घटनेनं संपूर्ण गाव हळहळलं

6 Year Old Girl Dies of Snakebite : सर्पदंश झाल्याने एका ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ती आपल्या मामाच्या गावी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आली होती, तेव्हा ही घटना घडली.

Ruchika Jadhav

अभिजीत सोनवणे, नाशिक

नाशिकमध्ये एका ६ वर्षांच्या मुलीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळलाय. तसेच संपूर्ण गावातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्टीमध्ये सर्वजण आपल्या गावी जातात. त्याचप्रमाणे ही चिमुकली देखील आपल्या मामाच्या गावी आली होती.

नाशिक तालुक्यातील चिंचोली फाटा येथे ती सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी आली होती. घराबाहेर खेळताना तिला सर्पदंश झाला. त्याने तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तिच्या आजोबांनी तिला उपचारासाठी शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

यावेळी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून तिला तपासण्यासाठी विलंब करण्यात आला आणि दोन ते तीन गोळ्या देऊन तिला घरी जाण्यास सांगितले. मात्र घरी गेल्यानंतर त्रास होऊ लागल्याने तिला नाशिकच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. नातेवाईकांचे म्हणणं आहे की, शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुलुंडमधील काही भागांत आज पाणीपुरवठा बंद!

Maharashtra Monsoon Alert : मुंबई, कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या सविस्तर

Ration Card Fraud: बोगस रेशन कार्ड वाटप, १०० लोकांकडून प्रत्येकी ३००० उकळले, अकोल्यातील घटनेने राज्यात खळबळ

Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

ITR Filling: पगारदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच

SCROLL FOR NEXT