ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

kalyan dombivli political news : ऐन निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. बड्या नेत्याने एकनाथ शिंदेंची साथ सोडली
shivsena political news
shivsena political newsSaam tv
Published On
Summary

कल्याणमध्ये राजकीय घडामोडींना वेग

तिकीट नाकारल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

कल्याणमध्ये विभाग प्रमुखाकडून पक्षाचा राजीनामा

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. ऐन निवडणुकीत तिकीट नाकारल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या विभाग प्रमुखानेच पक्षाचा राजीनामा दिला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख अनंता त्र्यंबक पगार यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अनंता पगार यांनी पत्र लिहित म्हटलं की, 'मी अनंता त्र्यंबक पगार आपणास कळवू इच्छितो, की मी शिवसेनेत सन 2005 सालापासून सक्रियपणे कार्यरत आहे. गेल्या 20 वर्षाच्या काळात पक्षाच्या संघटन वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या प्रभागात विविध कामे केली. आम्ही तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांची शिवसेनेची नाळ जोडली. परंतु सत्यस्थितीत पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून माझी आणि माझ्या प्रभागातील कार्यकर्त्याची गळचेपी केली जातेय'.

shivsena political news
मुंबईत वंचित बहुजन आघाडीला बालेकिल्ल्यात मोठा धक्का; ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने बंडखोरी उफाळली
shivsena political news
ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेसने भाकरी फिरवली; राजकारणात दिला सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

'आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. शहरातील स्थानिक नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला आमच्यावर होत असलेले अन्यायाला कंटाळून पक्ष सदस्यत्व तसेच विभाग प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. त्याचा स्वीकार करावा ही विनंती आहे. अत्यंत जड अंतकरणाने पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र,असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महानगरपालिकेत 27 उमेदवारांनी घेतली माघार

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 9 प्रभाग समितीमधील 11 ‍निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाले होते. 31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत एकूण 99 नामनिर्देशन अर्ज बाद ठरलेत. उमेदवारांना 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आलीये.

shivsena political news
२९ महापालिकांमध्ये ३३६०६ जणांना व्हायचंय नगरसेवक; मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सर्वाधिक अर्ज, तुमच्या शहरात किती?

ठाण्यात 1 जानेवारी 2026 रोजी एकूण 27 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यानंतर एकूण 891 उमेदवार शिल्लक राहिलेत. उद्या म्हणजे अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर अंतिमरित्या ‘निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची’ यादी जाहीर होणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com