Doctor Beaten Dharashiv News : धाराशिवमध्ये आरोग्य केंद्रातील डॉक्टरला क्षुल्लक कारणावरुन मारहाण, VIDEO व्हायरल

Dharashiv News : वैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ घुले यांना तेरखेडा येथील तिघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
Dharashiv News
Dharashiv NewsSaam TV

बालाजी सुरवसे

Dharashiv News : धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. धाराशिव-वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ घुले यांना तेरखेडा येथील तिघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

मारहाणीच्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या मारहाण प्रकरणी तेरखेडा गावातील सचिन उकरंडे, धनंजय मस्के, बाळू पौळ यांच्याविरुद्ध येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Dharashiv News
Solapur News: सोलापुरात भिडेंच्या समर्थानात मोर्चा, पोलिसांनी केला लाठीमार

तिन्ही आरोपींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आरडाओरडा केली. हाताला लावलेली पट्टी बदलण्यासाठी आरोपी तिथे आले होते. मात्र डॉक्टर तिथे उपस्थित नव्हते. त्यावेळी तू इथे कसा नव्हता? असे म्हणून आरोपींनी डॉक्टरांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना डॉक्टरांना मारहाण देखील केली. (Crime News)

Dharashiv News
Husband Kills wife: चहा उशिरा दिल्याने नवरा भडकला; रागाच्या भरात बायकोची केली हत्या

दरम्यान याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी नवनाथ घुले यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com