

श्री वासुदेव सत्रे, ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक
मोबाईल नंबर - 9860187085
मेष - आत्मविश्वास भरपूर वाढलेला असेल त्याचा करिअर मधे पूरेपूर फायदा करून घ्यायचा. गरिबांना अन्नदान केल्यास विशेष लाभ होईल.
वृषभ - अध्यात्मिकतेकडे कल असेल. पारिवारिक सुख भेटेन. अगदी निवांत दिवस आहे. शक्य झाल्यास परिवारासोबत फिरायला गेल्यास उत्तम.
मिथुन - मानसिक ताण जाणवेल, कुलदेवीची उपासना केल्यास लाभ होईल. विशेष निर्णय घेण्यास टाळलेलं बरं.
कर्क - अतिशय उत्साहात दिवस जाईल. नवीन वस्तू खरेदी करण्यास उत्तम दिवस. पोटाचे थोडेफार विकार होतील काळजी घ्यावी.
सिंह - नवनवीन लोकांसोबत परिचय होतील. आर्थिक लाभ होईल. दातांच्या समस्या जाणवतील. अन्नदान केल्यास विशेष लाभ होईल.
कन्या - विद्यार्थ्यांसाठी कसोटीच्या परिक्षेचा दिवस असेल. गणपतीची उपासना केल्यास लाभ होईल. व्यावसायिकांसाठी फायदेशीर संधी सहज उपलब्ध होतील.
तुला - शक्य असल्यास सोनं खरेदी कराव, शुभलक्षण राहिल. प्रेमात यशस्वी व्हाल. श्रीखंड किंवा दही खाऊन घराबाहेर पडावं, आनंदीआनंद होईल.
वृश्चिक - पूर्वी केलेल्या कार्याची शुभ फलशृती भेटेन. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. वाहन काळजीपूर्वक चालवा. आर्थिक व्यवहार टाळावे.
धनू - पति/पत्नी सोबत वाद टाळावेत. वाचनात दिवस घालवलेला योग्य. कुणालाही शब्द देणं टाळावं. शंकराची उपासना केल्यास विशेष लाभ होईल.
मकर - विशेष आर्थिक लाभ होईल. शक्य तेवढे मौन पाळावे. नोकरीत बदल करायचा असल्यास आजच निर्णय घ्यावा. शनि उपासना करावी.
कुंभ - परिवारातील प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं टाळावं. मित्रांपासून सावध राहा. मारुतीच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावं नारळ वाढवू नये.
मीन - चारो उंगली घी मे और सर कढाई मे, असा एकंदरीत आजचा दिवस आहे. काहीही करा उत्तम दिवस आहे. नवीन वस्त्र खरेदी केल्यास विशेष लाभ होईल.
Disclaimer - आर्टिकलमधील भाकीतं तज्ञांच्या अभ्यासावर अवलंबून असतात. साम टीव्हीवरील माहिती या सोबत सहमत असेलच असे नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.