shoumika mahadik calls satej patil for discussion about kolhapur haddwadh
shoumika mahadik calls satej patil for discussion about kolhapur haddwadh Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur News : शौमिका महाडिकांचा प्रस्ताव सतेज पाटील स्विकारणार का?

Siddharth Latkar

- रणजीत माजगांवकर

गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात काेल्हापूरची महापालिका आहे. सत्ताधा-यांना शहराची हद्दवाढ करणे का जमले नाही असा सवाल भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केला. हद्दवाढीचे आम्ही समर्थन करतो परंतु हद्दवाढ कृती समिती मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार यामागे राजकारणाचा वास येत असल्याची टीका महाडिक यांनी केली. दरम्यान हद्दवाढ संदर्भात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असे आवाहन महाडिक यांनी विराेधकांना केले आहे.

शौमिका महाडिक म्हणाल्या हद्दवाढ विरोधी कृती समितीचा ही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. चर्चा करून हद्द वाढीचा प्रश्न सोडवला पाहिजे. जिल्ह्याचा विकासाची चर्चा करताना राजकीय भूमिका बाजूला ठेवणे आवश्यक आहे. चर्चेसाठी मी पुढाकार घेते. विराेधकांनी नागरिक म्हणून चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता केले.

दरम्यान महाडिक यांनी काँग्रेसच्या शहर प्रमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांना कधी या प्रश्नावर काळा झेंडा दाखवला आहे का? गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आहे त्यांना हद्दवाढ जमली नाही? हे नागरिकांना देखील आता कळू लागल्याचे महाडिक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe : प्रिया मराठे पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत

Rohit- Virat Dance: वानखेडेवर विराट- रोहितची हवा! ढोल-ताशांच्या तालावर मनसोक्त नाचले,पाहा VIDEO

Guava Benefits: पेरू खाल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल होईल छुमंतर

Marathi Live News Updates : राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर

Radhakrishna Vikhe Patil meet Amit Shah : विखे पिता-पुत्रांनी घेतली अमित शहांची भेट; दूधाच्या आंदोलनावरील बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT