Jalgaon Shocking News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: बायकोशी वारंवार भांडण, नवऱ्याने उचलले टोकाचं पाऊल; खोलीत गेला अन्...

Jalgaon Police: जळगावमध्ये नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर बायको माहेरी निघून गेली. त्यानंतर नवऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या भुसावळमध्ये एका व्यक्तीने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच परिसरात खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरात ही घटना घडली. ५२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. दिगंबर बडे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे गंगाराम प्लॉट परिसरात ५२ वर्षीय व्यक्तीने आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दिगंबर बडे असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती समोर आली नाही. या घटनेमुळे भुसावळ शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

दिगंबर बडे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवले. काही दिवसांपासून त्यांचा पत्नीशी वाद सुरू होता. या वादातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. दिंगबर यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी माहेरी गेल्यामुळे आणि सततच्या वादाला कंटाळून दिगंबर यांनी टोकाचे पाऊस उचलले. त्यांनी घरामध्ये कुणी नसताना आपल्या खोलीमध्ये जाऊन बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिगंबर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दिगंबर यांनी आत्महत्येसाठी वापरलेली बंदूक विनापरवाना असून त्यामध्ये एकच गोळी असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT