Crime News: मैत्रिणीच्या बहिणीला इन्स्टाग्रामवर मेसेज करणं भोवलं, कुटुंबियांनी तरुणाचं अपहरण केलं अन्...

Crime News In Marathi : इन्स्टाग्रामवरुन मैत्रिणीच्या बहिणीला मेसेज केल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. मैत्रिणीच्या कुटुंबियांनी तरुणाचे अपहरण केले आणि त्याला जबर मारहाण केली.
Crime News
Crime NewsX
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

इन्स्टाग्रामवर मॅसेज पाठवल्याने एका तरुणीच्या कुटुंबियांनी २४ वर्षीय तरुणाची हत्या केली. त्यांनी पुण्याहून तरुणाचे अपहरण केले आणि दूरच्या ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. तरुणाचे अपहरण करुन त्याला ओढत नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने या प्रकरणी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील डोऱ्हाळे येथील साईनाथ गोरक्षनाथ काकड या २४ वर्षीय तरुणाची कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रुपाली लोंढे या तरुणीशी ओळख झाली. दोघेही शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात होते. साईनाथने रुपालीच्या बहिणीला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. याच्या रागात रुपाली आणि तिच्या कुटुंबियांनी साईनाथचे पुण्याहून अपहरण केले.

Crime News
मी पण सैन्यात जाईन, माझ्या वडिलांचा बदला... पाकड्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानाची लेक भावुक, पाहा Video

अपहरण केल्यानंतर साईनाथला कोकमठाण येथे आणून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मारहाणीनंतर त्याला विषारी औषध दिल्याचा आरोप साईनाथच्या कुटुंबियांनी केला आहे. अपहरण करताना साईनाथला पकडून ओढत नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.

Crime News
भयंकर! जाड्या-जाड्या म्हणून हिणवलं, २० KM पाठलाग अन् २ तरुणांवर धाडधाड गोळ्या झाडल्या

रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने, राहुल अशोक चांदर यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी रुपाली लोंढे ही फरार आहे. या घटनेचा कोपरगाव शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Crime News
Pune Accident : हळदीचा कार्यक्रम आटोपून परतताना दुचाकीचा अपघात, MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com