Crime: पतीकडून पत्नीवर वारंवार बलात्कार, सासऱ्यानेही अब्रु लुटली; पीडितेने अखेर काकांच्या घरी जात..

Uttarakhand Crime News: उत्तराखंडमधील देहरादूनमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका विवाहित महिलेने पती आणि सासऱ्यांविरोधात बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
Crime
CrimeSaam Tv
Published On

उत्तराखंडमधील देहरादूनमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका विवाहित महिलेने पती आणि सासऱ्यांविरोधात बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, अल्पवयीन असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. तसेच तिचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. ब्लॅकमेल करून आरोपीने पीडितेसोबत लग्न केले. त्यानंतर तिच्या सासऱ्यानेही पीडितेवर बलात्कार केला. यानंतर पीडितेने आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०२० साली पीडित महिला अल्पवयीन असताना तिची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. काही दिवसांनंतर आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये सतत बोलणं व्हायचं, आणि २१ डिसेंबर २०२० रोजी आरोपी पीडितेला मित्राच्या घरी घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले. व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करून आरोपीने वारंवार पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.

Crime
Whatsappवर स्टेट्स, बाथरूममध्ये जाऊन गळा चिरला; बीडच्या तरूणानं पुण्यात आयुष्य संपवलं

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिला दिल्लीला घेऊन गेला आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. लग्नानंतरही आरोपी पीडितेच्या मनाविरूद्ध लैंगिक अत्याचार करीत राहिला. इतकंच नाही तर, आरोपी घराबाहेर असताना त्याच्या वडिलांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे, असा आरोप पीडितेने तिच्या सासऱ्यांवर केला आहे.

Crime
Kolhapur: 'दुसऱ्याच्या जीवावर जगत्यात अन् आमच्यावर गोळी झाडत्यात व्हय..'कोल्हापूरच्या रांगड्यानं भाषणातून पाकिस्तानची जिरवली

१० एप्रिल रोजी पीडित महिला त्यांच्या तावडीतून सुटून आपल्या काकांच्या घरी गेली. तिने सगळी आपबिती आपल्या घरच्यांना सांगितली. सध्या ती मानसिक आणि शारीरिक त्रासातून सावरत असून उपचार सुरू आहेत. या गोष्टीला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पटेल नगर कोतवालीचे प्रभारी निरीक्षक हरिओम चौहान यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून पती आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com