
भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार संघर्षानंतर अमेरिकेने मध्यस्थी केली आणि १० मे रोजी शस्त्रविराम करण्यात आला. पण तरीही त्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच होत्या. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक शाळकरी मुलगा आपल्या कोल्हापूरी शैलीत पाकिस्तानविरोधात भाषण करत आहे. त्याने आपल्या भाषनातून पाकिस्तानवर जोरदार टिका केली आहे. त्याने केलेल्या भाषणातून चिमुकल्याचं देशप्रेम दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओ कोल्हापुरातील चंदगडमधील दूंडगे गावातील आहे. या व्हिडिओमध्ये दुंडगे गावातील कुमार विद्यामंदीर ही शाळा दिसून येत आहे. शाळेच्या बाहेर सर्व विद्यार्थी जमले आहेत. तसेच शिक्षकही आहेत. तर, व्यासपिठावर एक चिमुकला भाषण करत आहे. त्याचे भाषण पाकिस्तानविरोधात असून, यातून त्याचे देशप्रेम दिसून येत आहे.
या भाषणात विद्यार्थी 'हे पाकिस्तानवाले नक्की काय करतात, दुसऱ्याच्या जीवावर जगतात आणि आम्हाला गोळ्या घालतात व्हय. गोळी लागली तर, आम्ही मरणार नाही आणि लागली तर, लागुदेत आम्ही देशासाठी मरणार की..., जाता जाता एवढंच म्हणतो की, डोळ्यात रोखली आग, श्वासात वादळ रोखलं, देव आमचा छत्रपती एकटा भिडतोय बघा वाघ.. छत्रपती शिवाजी महाराज की जय...' असं म्हणत पठ्ठ्याने आपलं भाषण संपवलं.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ युनिकबेळगावच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी चिमुकल्याचं कौतुक करत कमेंट्समध्ये चिमुकल्याची स्तुती केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.