IND v/s PAK: प्रत्युत्तरामध्ये भारताने पाकिस्तानचं किती नुकसान केलं? कर्नल सोफिया कुरेशी यांनी पुरावेच दाखवले

India-Pakistan Tensions Escalate: शनिवारी सकाळी भारताने पाकिस्तानच्या चार महत्त्वाच्या एअरबेसवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केले आहे. याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.
Sofia Quereshi
Sofia QuereshiSaam
Published On

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहे. सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताच्या दिशेने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. याला भारतही जशाच तसे उत्तर देत आहे. अशातच शनिवारी सकाळी भारताने पाकिस्तानच्या चार महत्त्वाच्या एअरबेसवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केले आहे. याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाबाबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, संरक्षण मंत्रालयाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी उपस्थित होत्या.

Sofia Quereshi
India-Pakistan: भारत पाकिस्तानातील तणाव वाढला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

पत्रकार परिषदेत कर्नल कुरेशी म्हणाल्या, पाकिस्तानी सैन्य पश्चिम आघाडीवर आक्रमक कारवाया करीत आहे. या काळात पाकिस्तान लढाऊ विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले करत आहे. पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार करत आहे. उधमपूर, भुज, आदमपूर, पठाणकोटमध्ये भारताचे काही नुकसान झाले आहेत.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, पाकिस्तान सतत खोटे दावे करत आहे. पाकिस्तानच्या सरकारी संस्थांवर हल्ले केल्याचा खोटा दावा पाकिस्तान करत आहे. वीज आणि पायाभूत सुविधांवर मोठे हल्ले झाले, हे पूर्णपणे खोटे असल्याचं विक्रम मिस्त्री म्हणाले.

Sofia Quereshi
Washim: ४ दिवसांपूर्वी लग्न, अंगावरची हळद ओलीच, सीमेवरून बोलावणं आलं; कृष्णा अंभोरे कर्तव्यावर रवाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com