Jalgaon Shocking News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: पोलिओ डोस अन् लस दिल्यानंतर भयंकर घडलं, अवघ्या १० मिनिटांत बाळाचा मृत्यू; जळगावमध्ये खळबळ

Baby Girl Dies Following Polio Vaccination: पोलिओ डोस आणि लस घेतल्यानंतर अडीच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली.

Priya More

Summary:

  • पोलिओ डोस घेतल्यानंतर बाळाचा मृत्यू

  • चाळीसगावमध्ये लसीकरणानंतर अडीच महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

  • जळगाव शासकीय रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

  • लसीकरण मोहिमेदरम्यान बाळाचा मृत्यू

संजय महाजन, जळगाव

पोलिओ डोस आणि लस घेतल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत अडीच महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना जळगावच्या चाळीसगावमध्ये घडली. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या मुलीला रात्री उशिरा नेण्यात आले. पण त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी गावात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. दीपक बोरसे यांची अडीच महिन्यांची मुलगी संचिताला जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान पोलिओ डोस आणि लस देण्यात आली होती. पण लस दिल्यानंतर १० मिनिटात तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

मृत्यू झालेल्या मुलीचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असून सध्या अयोध्या येथे सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. या घटनेमुळे जळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेण्यात आला. रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे मुलीचे आजोबा तुळशीदास मराठे हे अडीच महिन्यांच्या नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर शवविच्छेदन विभागाबाहेर बसून होते. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT