Accident News : महामार्गावर भीषण अपघात! रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

Tamilnadu Car Accident News : तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यात पहाटे भीषण अपघात झाला असून भरधाव कारने उभ्या ट्रकला धडक दिल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पोलीस कॉन्स्टेबलसह अनेकांचा समावेश आहे.
TIRUPUR ACCIDENT: SPEEDING CAR HITS TRUCK, 6 DEAD IN TAMIL NADU
TIRUPUR ACCIDENT: SPEEDING CAR HITS TRUCK, 6 DEAD IN TAMIL NADUSaam Tv
Published On
Summary
  • तिरुपूर जिल्ह्यात पहाटे भीषण अपघात घडला

  • भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडक दिली

  • सहा जणांचा जागीच मृत्यू, पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश

  • अतिवेग हे अपघाताचे मुख्य कारण असल्याची प्राथमिक माहिती

तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यात बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. वेल्लाकोविलजवळ करूर राष्ट्रीय महामार्गावर नाक्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल, ट्रकचालक आणि कारमधील चार प्रवाशांचा समावेश आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेल्लाकोविलजवळ करूर राष्ट्रीय महामार्गावर नाक्याजवळ एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. याचदरम्यान मागून येणारी भरधाव कार अपघातग्रस्त ट्रकला धडकल्याने दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

TIRUPUR ACCIDENT: SPEEDING CAR HITS TRUCK, 6 DEAD IN TAMIL NADU
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यातलं पाणी पिताय? थांबा! त्यापूर्वी 'हे' आधी करा

अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य तत्काळ सुरू करण्यात आले. गंभीररीत्या नुकसान झालेल्या वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

TIRUPUR ACCIDENT: SPEEDING CAR HITS TRUCK, 6 DEAD IN TAMIL NADU
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अतिवेग हे अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. मात्र, इतर कोणतेही कारण असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. वेल्लाकोविल पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे करूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने नुकसानग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com