Police investigate the crime scene near Eidgah Bridge in Manmad where a young man was brutally murdered. saam tv
महाराष्ट्र

साखरपुड्यानंतर गावी आला, तरुणाला टोळक्यांनी गाठलं, धारदार शस्त्रांनी सपासप वार, पहाटे नेमकं झालं काय?

Youth Murdered After Engagement In Manmad: मनमाडमध्ये साखरपुड्यानंतर गावी आलेल्या तरुणाची अज्ञात टोळक्याने धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. ईदगाह पुलाजवळ घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक(मनमाड) : शहरातील ईदगाह पुलाजवळ रात्रीच्या वेळी धक्कादायक घटना घडली आहे. सुदर्शन चव्हाण या तरुणाची अज्ञात टोळक्याने धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. मानेवर आणि चेहऱ्यांवर वारंवार घाव घातल्यामुळे सुदर्शनचा घटनास्थळी मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन चव्हाण मुंबईत वास्तव्यास होता यांनो दोन दिवसांपूर्वीच मनमाड येथे आला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर येत असून या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.

किल्ली मागितली अन् पोराने वडिलांच्या डोक्यात घातली लाकडी फळी

पत्नीसोबत घराबाहेर जाणाऱ्या मुलाला घराची किल्ली माझ्याकडे दे असे सांगितल्याचा राग आल्याने वृद्ध वडिलांना शिवीगाळ करत मारहाण करून लाकडी फळी डोक्यात मारून दुखापत केल्याची घटना नाशिक शहरातील पंचवटीमधील कुमावतनगर परिसरात घडली.

याबाबत दीपक निवृत्ती कुमावत (वय 75) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून मुलगा ज्ञानेश्वर दीपक कुमावर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा दीपक घराला कुलूप लावून पत्नीसोबत बाहेर जात असताना घराची किल्ली ते असे सांगितल्याचा राग आल्याने मुलाने शिवीगाळ करत मारहाण करून डोक्यात लाकडी फळी मारली होती. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT