जिल्हा परिषद भरतीत महाघोटाळा? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली सरकारी नोकरी, महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

woman arrested for fake disability certificate in Maharashtra : पालघर जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Palghar recruitment scam arrest
Palghar Police investigate the alleged fake disability certificate scam linked to Zilla Parishad recruitment.Saam
Published On

रूपेश पाटील, पालघर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Palghar ZP recruitment scam News : पालघर जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील रूपाली तुषार टेंगळे यांनी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत पालघर जिल्हा परिषदेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद मिळवले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची डहाणू तालुक्यातील चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने पडताळणी प्रक्रिया सुरू केली.

Palghar recruitment scam arrest
Ladki Bahin Yojana: पुन्हा ईकेवायसी सुरू होणार? एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहि‍णींना दिला शब्द, वाचा नेमकं काय म्हणाले?

चौकशीदरम्यान संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कारवाई करत रूपाली टेंगळे यांची सेवा समाप्त केली. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांकडून बनावट प्रमाणपत्र नेमके कुठून तयार करण्यात आले, त्यामागे आणखी कोणी एजंट किंवा रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. पालघर जिल्हा परिषदेत विविध विभागांतील भरती प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने इतर नियुक्त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Palghar recruitment scam arrest
Vidarbha Expressway : मोठी बातमी! विदर्भात ४ महामार्ग होणार, कुठून कोणता एक्सप्रेस वे जाणार? वाचा A टू Z माहिती

या प्रकरणामुळे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः दिव्यांग आरक्षणातील भरती प्रक्रियेत अधिक काटेकोर तपासणीची गरज व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रमाणपत्रांची डिजिटल पडताळणी आणि वैद्यकीय समितीकडून पुनर्तपासणी करण्याबाबत विचार सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Palghar recruitment scam arrest
Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com