Shocking Leopard Attack in Daund Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: आईच्या कुशीत झोपलेल्या ११ महिन्यांच्या बाळावर बिबट्याची झडप, दौंडमध्ये भीतीचे वातावरण

Shocking Leopard Attack in Daund: दौंडमध्ये बिबट्याने आईच्या कुशीत झोपलेल्या ११ महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. दिवसभर बाळाचा शोध घेतला पण सापडले नाही. त्यामुळे आई-वडिलांचे रडून बेहाल झाले.

Priya More

आईच्या कुशीमध्ये झोपलेल्या बाळावर बिबट्याने झडप टाकली आणि त्याला पळवून नेल्याची धक्कादायक घटना पुण्याजवळ घडली आहे. मेंढपाळ करणारी महिला आपल्या कुटुंबासोबत झोपली होती. महिलेच्या कुशीत झोपलेल्या ११ महिन्याच्या बाळाला बिबट्याने पळवून नेले. पुण्यातील दौंड तालुक्यातील दहिटणे येथे ही घटना घडली. या घटनेनंतर रडून रडून महिलेचे बेहाल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील दहिटणे येथील एका शेतामध्ये ही घटना घडली आहे. धुळा बोलू भिसे हे आपली पत्नी आणि ११ महिन्यांचा मुलासोबत मेंढ्यांच्या कळपाजवळ झोपले होते. ते झोपलेल्या ठिकाणाजवळ उसाच्या शेतात बिबट्या दबा धरून बसला होता. या बिबट्याने मध्यरात्रई आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उसाच्या शेतात पळवून नेले.

डोळ्यासमोर आपल्या बाळाला बिबट्या घेऊन जात असल्याचे पाहून देखील आई-वडील काही करू शकले नाही. बाळाच्या आई-वडिलांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत बिबट्या बाळाला घेऊन पसार झाला. या घटनेची माहिती दौंड वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर पुणे येथील रेस्क्यू टीम, दौंड वन विभागाचे वनसंरक्षक दीपक पवार, दोडक वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे आणि यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बाळाचा शोध घेण्यासाठी त्यांनी शोधमोहिम राबवली. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बाळाचा शोध घेण्यात आला पण बाळ कुठेच सापडले नाही. याठिकाणी उसाचे मोठे क्षेत्र असल्यामुळे बाळाचा शोध लागू शकला नाही. बाळ सापडले नसल्यामुळे आई-वडिलांनी हांबरडा फोडला. दरम्यान, बोरीपारधी गावच्या हद्दीत १७ नोव्हेंबर २०२४ रोजी भरदिवसा ऊसतोड मजुराच्या ३ महिन्यांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करीत त्याला ठार केले होते. पाच महिन्यांत तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी युती नाही

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

SCROLL FOR NEXT