चेतन व्यास
वर्धा : आष्टी वनपरिक्षेत्रातंर्गत जुना अंतोरा मौजा परिसरात शेताच्या बांधावर मृतावस्थेत बिबट्या आढळून आला आहे. साधारण पाच दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून मृत बिबट्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यातच वन्य प्राण्यांना पिण्यास पाणी मिळत नसल्याने पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. अशातच आष्टी वनपरिक्षेत्रातंर्गत जुना अंतोरा मौजा परिसरात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत बिबट्याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. यानंतर पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
पाण्याअभावी मृत्यूची शक्यता
दरम्यान बिबट्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर बिबट्याला पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. त्याआधी त्याने काहीतरी शिकार खाल्ली असावी. यानंतर पाण्याच्या शोधात फिरत असताना पाण्याअभावी त्याचा मृत्यू झाला असावा.असा अंदाजही वनविभागाने व्यक्त केला. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर पाच दिवसांपासून बिबट मृतावस्थेत पडून होता. ही वनविभागासाठी गंभीर बाब आहे. वनविभागाचे लक्ष नसल्याने अशा घटना घडत आहे.
विषप्रयोग केल्याचा संशय
मागील अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे शेतकरी चांगलेच भयभीत होते. त्यातच गाई, वासरू, कालवडी या प्राण्यांवर हल्ले होत असल्यामुळे कोणीतरी बकरी अथवा एखाद्या प्राण्यावर विष प्रयोग करून तो बिबट्याला खाण्यासाठी दिला असावा. ती शिकार खाल्ल्यामुळेच बिबट मृत्यू पावल्याची चर्चा होती.
नमुने तपासणीसाठी नागपूरला
कुजलेला स्थितीत व सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने बिबट्याचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभागाने अंत्यसंस्कार केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे शवविच्छेदन करून नमुने फॉरेन्सिक लॅब नागपूरला पाठविले. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बिबट्याचा मृतदेह नेमका कशाने झाला. याचा उलगडा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.