Bhandara : डॉक्टरांनी १४ इंजेक्शन देण्याचे म्हणताच सत्य आले समोर; शासकीय अनुदानासाठी शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्याचा बनाव

Bhandara News : सकाळी शेतात मोहाची फुले वेचत असताना समोरून वाघ आला. या वाघाने हल्ला करून जखमी केल्याने बेशुद्ध झालो, असे सांगत तो वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयात भरती झाला
Bhandara News
Bhandara News Saam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : फसवणूक करून लुबाडणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र भंडाऱ्यात एक वेगळाच प्रकार समोर आला असून यात एका शेतकऱ्याने बनाव केला. तो देखील नुकसान भरपाई मिळण्यासाठी हा बनाव केला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर १४ इंजेक्शन देण्याचे सांगताच, शेतकऱ्याने सत्य प्रकार सांगितला. यानंतर त्याने रुग्णालयातून घरी धूम ठोकली.  

वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची रुग्णाने तयार केलेली रंजक कथा भंडाऱ्याच्या साकोलीत उघडकीस आली आहे. हा सर्व खटाटोप केवळ शासकीय अनुदान मिळविण्यासाठी केल्याचं त्यानं सांगितलं आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. साकोली तालुक्यातील मोहघाटा येथील दुधराम मेश्राम असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दुधराम या शेतकऱ्याने वाघांच्या हल्ल्याची कथा तयार केली होती. 

Bhandara News
Thane Crime : भयानक कृत्य! खेळणे देण्याच्या बहाण्याने घरी नेत मुलीवर अत्याचार; आरडाओरड केल्याने सहाव्या मजल्यावरून फेकले

उपचारासाठी रुग्णालयात झाला भरती 

सकाळी शेतात मोहाची फुले वेचत असताना समोरून वाघ आला. या वाघाने हल्ला करून जखमी केल्याने बेशुद्ध झालो, असे सांगत तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयात भरती झाला. वाघाने हल्ला केल्याचे सांगितल्याने वन विभाग देखील सतर्क झाले होते. दरम्यान नुकसान भरपाई म्हणून मिळणारे शासकीय अनुदान लाटण्यासाठी हा सर्व बनाव रचला होता. 

Bhandara News
Washim Water Crisis : वाशिममध्ये पाणीटंचाई गडद; १ हजार लिटर पाण्यासाठी मोजावे लागताय २५० रुपये

आणि घराकडे ठोकली धूम 

दरम्यान वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची बतावनी करून रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला रेबीजचे १४ इंजेक्शन घ्याव लागणार, असा सल्ला डॉक्टरांनी रुग्णाला दिला. डॉक्टरांचा हा सल्ला ऐकून वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा बनाव करणारा रुग्ण उभा राहिला आणि त्याने हा सर्व बनाव असल्याचे सांगितले. यानंतर त्याने घराकडे धूम ठोकली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com