Leopard Attack : घरातच थरार! कुत्र्याची शिकार करायला आला, बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला, बचाव करताना शेतकर्‍याने बिबट्याचा घेतला जीव

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या वारेली या गावात अंगावर काटा आणणारी थरारक घटना घडली आहे. घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डेरवण रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

चिपळूण (रत्नागिरी) : वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. यातच बिबट्याने घरात येऊन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना चिपळूण तालुक्यातील वारेली येथे घडली. पण शेतकऱ्यानेही हार न मानता बिबट्याने केलेल्या हल्ल्यावर प्रतिहल्ला चढविला आणि दोन हात केले. साधारण पाच- दहा मिनिट झटापट सुरु असताना आपला जीव वाचविण्यात शेतकऱ्याने यश मिळविले. 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या वारेली या गावात अंगावर काटा आणणारी थरारक घटना घडली आहे. या घटनेत शेतकरी आशिष शरद महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डेरवण रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान आशिष महाजन हे घरात असताना बिबट्याने घरात प्रवेश करत महाजन यांच्यावर मागून हल्ला केला. बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी काही वेळी भेदरला होता. मात्र सुटका करण्यासाठी प्रतिहल्ला करण्यास सुरवात केली. 

Leopard Attack
IND vs NZ : भारताविरोधात किवीच्या संघाची घोषणा, पहिल्या सामन्याला विल्यमसन मुकणार, कुणाला मिळाली संधी?

मादी बिबट्याला केले ठार 

दरम्यान शेतकरी महाजन व बिबट्या यांच्यात काही मिनिटे झटापट झाली. बिबट्याने नखे व जबड्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने महाजन हे रक्तबंबाळ झाले होते. तरी देखील त्यांनी हार न मानता रक्तबंबाळ अवस्थेतच प्रतिहल्ला केला. अखेर घरात असलेल्या भाल्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात मादी जातीचा बिबट्या ठार झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. 

Leopard Attack
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डुलकी लागल्याने समोरच्या ट्रकला मागून धडक, एक ठार, दोन जखमी

शिर्डी विमानतळावर बिबट्याचा वावर 
शिर्डी (अहिल्यानगर)
: शिर्डी विमानतळात बिबट्या वावर असल्याचे पाहण्यास मिळाले. मादी बिबट्यासह दोन ते तीन पिल्लांचा रणवे परिसरात वावर आहे. रणवेच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये बिबट्याने निवारा बनवला असून गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार येथे पाहण्यास मिळत आहे. विमानतळाच्या संरक्षक भिंतींची उंची कमी असल्याने बिबटे सहज परिसरात प्रवेश करतात. तर संरक्षक भिंतीवरून उडी मारून विमानतळ परिसरात प्रवेश करतानाचा बिबट्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com