IND vs NZ : भारताविरोधात किवीच्या संघाची घोषणा, पहिल्या सामन्याला विल्यमसन मुकणार, कुणाला मिळाली संधी?

New Zealand Squad: भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १६ ऑक्टोबरपासून तीन सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
New Zealand
New Zealand Cricket kane williamson
Published On

New Zealand Test squad vs India announced: भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. टॉम लेथमच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ भारताविरोधात तीन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला माजी कर्णधार केन विल्यमसन मुकण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने ट्वीट करत भारताविरोधात कसोटी खेळणाऱ्या संघाची माहिती दिली.

भारतीय संघाने मायदेशात बांगलादेशविरोधात झालेल्या दोन सामन्याच्या कसोटी सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. आता १६ ऑक्टोबरपासून मायदेशात भारतीय संघ न्यूझीलंडविरोधात दोन हात करणार आहे. या तीन सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. टॉम लेथम संघाचे नेतृत्व करत आहे.

न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी फलंदाज केन विल्यमसन दुखापतीचा सामना करत आहे. तो पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. श्रीलंकाविरोधात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विल्यमसनला दुखापत झाली आहे. त्याला भारतात पोहचण्यासाठी उशीर होईल, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने दिली. माइकल ब्रेसवेस याला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान दिले, पण उर्वरित दोन सामन्याआधी तो मायदेशी परतणार आहे. अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी मायकल ब्रेसवेसच्या जागी ईश सोढी याला संधी देण्यात आली आहे.

भारताविरोधात तीन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी कसा असेल न्यूझीलंडचा संघ?

टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (फक्त पहिला कसोटी सामना), मार्क चॅपमॅन, डेवोन कॉनवे, मॅट हेनरी, डेरिल मिचेल, विल ओ'रूर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, बेन सियर्स, ईश सोढी (दुसरा अन् तिसरा सामना), टिम साउदी, केन विलियमसन, विल यंग.

भारत-न्यूझीलंड मालिकेचं वेळापत्रक -

पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबर - २० ऑक्टोबर - बंगळुरु

दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर - पुणे

तिसरा कसोटी सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर - मुंबई, वानखेडे स्टेडियम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com