सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे
भीमा नदीवरील पुलाचे महाकाय खांब कोसळल्याची घटना दौंड-गार गावादरम्यान घडली आहे. हा पूल पुणे नगरला जोडण्याचं काम करत होता. भीमा नदीवर नव्याने होत असलेल्या पुलाचे खांब दौंड-गार गावादरम्यान कोसळले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम असल्याने पुलाचे खांब कोसळल्याचा आरोप केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात (Bhima River Bridge Pillars Collapsed) आहे. स्थानिकांनी याबाबत अनेकदा दौंड बांधकाम विभागाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. तरीही बांधकाम विभागाने कानाडोळा करून पुलाचं काम सुरू ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. भीमा नदीवरील महाकाय खांब कोसळले आहेत. पुणे आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड-गार गावादरम्यान (Daund-Gar Village) ही दुर्घटना घडली आहे.
नव्याने होत असलेल्या भीमा नदीवरील (Bhima River) पुलाचे खांब कोसळले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पुलाचे खांब कोसळले आहेत. स्थानिकांनी या पुलाच्या कामाबाबत दौंड बांधकाम विभागाला अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून काम तसेच सुरू ठेवले होते. मात्र, आज भीमा नदीला पाणी आल्यामुळे पुलाचे खांब कोसळले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही.
अतिशय भयानक अशी दृश्ये व्हिडिओमध्ये दिसत आहेत. २१ कोटी रूपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. काम निकृष्ट दर्जाचं होतं. पुलाचं काम करताना सतत अडचणी येत असल्याचं समोर आलं (Pune And Nagar) आहे. निकृष्ट कामामुळेच हा पूल कोसळल्याचं स्थानिक म्हणत आहेत. नगर आणि पुण्यात पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर लगेच पूलाचे खांब कोसळल्याची घटना समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.