Hording Collapse Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, मृतांचा आकडा १८ वर; चौकशीसाठी एसआयटीचीही स्थापना

Ghatkopar Hording Collapse Accident :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत एकूण मृतांची संख्या १८ झाली आहे. या प्रकरणी आता चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, मृतांचा आकडा १८ वर; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
Ghatkopar Hording CollapseSaam Tv

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. होर्डिंग कोसळून जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत एकूण मृतांची संख्या १८ झाली आहे. तसेच प्रकरणी आता चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या अनधिकृत होर्डिंगचा मालक भावेश भिंडेला अटक केली. त्यानंतर आता या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर हे एसआयटीचं नेतृत्व करणार आहेत.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, मृतांचा आकडा १८ वर; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
Wardha Accident : प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्स आणि एसटी बसचा भीषण अपघात; 4 लहान मुलांसह 16 प्रवासी जखमी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत एकूण १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या घटनेत ७० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणातील इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेला सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, मृतांचा आकडा १८ वर; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
Prashant Kishor : भाजप किती जागा जिंकणार? प्रशांत किशोर यांनी केली मोठी भविष्यवाणी, आकडेवारीचा अंदाज सांगितला!

या प्रकरणी आतापर्यंत भिंडेच्या कर्मचाऱ्यांसह सात जणांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासात व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांची गुन्हे शाखा मदत घेणार आहे.

इगो मीडियाचे टिळक ब्रिजवरील होर्डिंग हटवले

इगो मिडिया जाहिरात कंपनीचे दादरच्या टिळक ब्रिजवरील होर्डिंग्स हटविण्यात आले आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात इगो जाहिरात कंपनी दोषी आहे. महापालिकेने रेल्वेला तीन दिवसात होर्डिंग हटवण्यासाठी नोटीस दिली होती. त्यानंतर आता होर्डिंग हटवले आहेत. मात्र, ढाचा तसाच आहे. या होर्डिंगचा ढाचा देखील लवकर काढण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com