Family Distress Leads Kolhapur Dentist Saam
महाराष्ट्र

बॅगेत दगड भरून तलावात उडी मारली, कोल्हापुरात डॉक्टरने आयुष्य संपवलं, टोकाचा निर्णय का घेतला?

Family Distress Leads Kolhapur Dentist: पाठीवरील बॅगेत दगड भरून दंतचिकित्सकाची आत्महत्या. राजाराम तलावानजीक घटना; मित्रांना पाठवला संदेश; मृत जयसिंगपूरचा रहिवासी.

Bhagyashree Kamble

कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दंतचिकित्सकाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने पाठीवरील बॅगेत दगड, विटा भरल्या. तसेच तलावात उडी घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने अनेकांना अखेरचा संदेश पाठवला. कौटुंबिक नैराश्यातून त्याने आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे.

अवधूत मुळे असे दंतचिकित्सकाचे नाव आहे. हा तरूण जयसिंगपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी त्याने बॅगेत दगड आणि विटा भरल्या. तसेच मित्रपरिवाराला शेवटचा संदेश पाठवला. अवधूतने नंतर दुचाकीने राजराम तलाव गाठले. राजाराम तलावाच्या काठावर दुचाकी उभी करून 'सुसाईड नोट' लिहिली.

सुसाईट नोट लिहून झाल्यानंतर त्याने तलावात उडी मारून आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. कौटुंबिक नैराश्येतून त्याने आत्महत्या करून जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT