मुंबई गोवा महामार्गावर कार अन् कंटेनरचा अपघात, दोघांचा मृत्यू, तर मुबंई - पुणे महामार्गावरही ट्राफिक जाम

Lonavala, Mumbai-Pune Highway Jammed: शनिवार अन् रविवारचा विकेंड असल्याकारणाने मुंबई पुणे जुना महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग तसेच लोणावळ्याच वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
accident on Mumbai-Goa Road
accident on Mumbai-Goa RoadSaam
Published On

विकेंडला आपली पावलं आपोआप गावाकडं किंवा फिरण्याच्या दिशेनं वळतात. रेल्वेचं तिकीट लवकर उपलब्ध नाही झाले तर, काही जण थेट रस्त्याची वाट धरतात. रस्तेमार्गे प्रवास करून स्थळ गाठतात. यामुळे विकेंडच्या दिवशी वाहतूक कोंडी होती. तसेच ये - जा करताना वेळ जास्त वाया जातो. सध्या मुंबई पुणे जुन्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तसेच लोणावळ्यातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. मुंबईहून कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कारची मागून कंटेनरला धडक बसली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, उर्वरीत दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर कोलाडमधील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

accident on Mumbai-Goa Road
५१ वर्षीय नराधमाची मुलीच्या मैत्रिणींवर वाईट नजर; ३ मुलींच्या अंगावरून हात फिरवला अन्...जाब विचारताच नातेवाईकावर हल्ला

ही घटना सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळच्या पुई गावाजवळ घडली. अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या एकाला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू पायलट दाखल झाले आहे. या अपघातानंतर वाहतूक कोंडी आणखी वाढ झाली आहे.

मु्ंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

मिळालेल्या माहितीनुसार,  मुबंई पुणे जुन्या महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. खोपोली बोरघाटात ते खंडाळा दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बोर घाटात वाहनांच्या रांगामुळे वाहतूक संथगतीने सुरूये. शनिवार रविवार सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने मुंबईकर बाहेर निघाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून, सात ते आठ किलोमीटरपर्यंत अंतरावर वाहनांच्या लांबच लांबा लागल्या आहेत.

accident on Mumbai-Goa Road
आधी शरीरसंबंध ठेवले, बॉयफ्रेंडपासून लव्ह बाईट लपवण्यासाठी तरुणीचा कारनामा, कॅब चालकावरच बलात्काराचा आरोप

लोणावळ्यात वाहतूक कोंडी

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्या खासगी वाहनाने पर्यटक आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. थंडीचे वातावरण असल्याने टायगर पॉईंटवर जाण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगेत रांगा लागल्या आहे. टायगर पॉईंट भुशी डॅम सहारा ब्रिज याकडे चार चाकी वाहन जाण्यास बंदी असूनही, आदेशाला केराची टोपली देत पर्यटक वाहने टायगर पॉईंटकडे जाताना दिसत आहे. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोर घाटातही वाहतूक कोंडी झालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com