ब्रेकअप होताच बॉयफ्रेंडची सटकली; गर्लफ्रेंडच्या घरात जाऊन गोळ्या झाडल्या

Youth Fires at Former Girlfriend: लखनऊमध्ये तरूणाने गर्लफ्रेंडच्या घरात जाऊन गोळीबार केला. तरूणीवर उपचार सुरू.
Youth Fires at Former Girlfriend
Youth Fires at Former GirlfriendSaam
Published On

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरूणाने आपल्या प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार केला. सुदैवाने तरूणीचे प्राण वाचले. गोळी तिच्या हाताला लागली असल्याची माहिती आहे. ही घटना पारा पोलीस स्टेशन परिसरात घडली असून, शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. सध्या तरूणीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आकाश कश्यप असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर, लक्ष्मी थापा असे गोळीबार झालेल्या जखमी तरूणीचे नाव आहे. पारा येथील काशीराम कॉलनीत राहणाऱ्या लक्ष्मी थापा यांची मोठी बहीण राधिका थापा यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पारा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Youth Fires at Former Girlfriend
बलात्कार अन् प्रायव्हेट पार्टमध्ये कापडाचे तुकडे... क्रूर बॉयफ्रेंडनं विवाहित महिलेला छळलं, शेवटी तिनं आयुष्य संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी आणि तरूणाचे पूर्वी प्रेमसंबंध होते. परंतु, नंतर मुलीचे ब्रेकअप झाले. गेल्या वर्षभरापासून महिलेनं आरोपीशी बोलणे बंद केले होते. त्याच्याशी संबंध तोडले होते. यामुळे संतप्त होऊन आरोपीनं हे कृत्य केलं. सध्या तरूणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

Youth Fires at Former Girlfriend
Drone: कसाऱ्याजवळ डोंगरावर आढळला ड्रोन, परिसरात उडाली खळबळ

सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com