Crime Saam tv
महाराष्ट्र

सैतान बापानं मुलीला लटकवलं, चोरीच्या संशयातून जन्मदात्याचं सैतानी कृत्य, सांगलीत काळीमा फासणारी घटना

Latest crime news in Maharashtra : सांगलीत चोरीच्या संशयावरून बापाने दोन मुलींना रात्रभर लटकवून ठेवले. यात ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

Namdeo Kumbhar

रोहित कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

father kills daughter over theft suspicion in Sangli : चोरीच्या संशयावरून निष्ठूर बापानं पोटच्या मुलीचा जीव घेतलाय. बापाच्या सैतानी कृत्यानं वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासलंय. नेमकी ही घटना काय आहे ?आणि कशामुळे घडलीये? पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...

हा फोटो नीट पाहा...या निष्ठूर बापानं चोरीच्या संशयातून पोटच्या मुलीचा जीव घेतला..दोन मुलींना रात्रभर घरात उलटं टांगून ठेवलं..मुली रात्रभर पाणी पाणी असा आक्रोश करत राहिल्या पण या बापाला पाझर फुटला नाही आणि पहाटे एका मुलीनं जीव गमावला तर दुसरी मुलगी रूग्णालयात दाखल आहे.

सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातल्या बनपुरीमध्ये घडलेली ही घटना 25 तारखेला अनुजा आणि ऋतुजा या बहिणी नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या. या दोघींवर शेजारच्याच एका कुटुंबाकडून त्यांच्या घरात चोरी केल्याचा आरोप करण्यात आला. यावर संतापलेल्या दादू यमगरनं त्यांना राग अनावर झाल्यानं त्यांन मुलींना थेट घरात लटकवून ठेवलं..यात नऊ वर्षांच्या ऋतुजाचा मृत्यु झाला तर दहा वर्षाच्या अनुजाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. हैवान बापानं ही गोष्ट पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्न केला..मात्र दुसऱ्या मुलीमुळे क्रूरकर्मा बापाचं हे कृत्य समोर आलं.

दादू यमगारनं सकाळी कुणालाही या घटनेबद्दल न सांगता आपल्या मृत मुलीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.मात्र त्याचवेळी रुग्णालयात उपचार घेणाऱी अनुजा शुद्धीवर आली आणि तिने घडलेला सगळा प्रकार डॉक्टरांना सांगितला. त्यानंतर रुग्णालयाकडून पोलिसांनी या घटेनेची माहिती घेतली.आणि अंत्यसंस्कार थांबवून यमगारला ताब्यात घेतलंय.

ज्यांच्या खांद्यावर बसून ऋतुजानं जग पाहायचं स्वप्न पाहिलं, त्याच जन्मदात्यानं निव्वळ संशयावरून तिचा जीव घेतला..दादू यमगारला कायद्यानं शिक्षा होईलही पण यामुळे वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासला गेला, एव्हंढ मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवारांसोबतची आजची भेट राजकीय भेट नव्हती - दिलीप वळसे पाटील

Mumbai : मुंबई हादरली! मध्यरात्री रिसॉर्टमध्ये गोळीबार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

Reheated rice: कालचा भात गरम करून खाण्यापूर्वी हे नक्की वाचा; एका चुकीमुळे होईल फूड पॉइझनिंग!

Kuchu Puchu Meaning : कुचू-पुचू म्हणजे नेमकं काय? व्हायरल होणाऱ्या Gen Z स्लँग्सचा मजेशीर अर्थ जाणून घ्या

SCROLL FOR NEXT