Maharashtra Politics : संजय राऊत ठाकरेंची शिवसेना सोडणार? भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ

Sanjay Raut latest news : शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरून ठाकरेसेनेत अंतर्गत वाद उफाळला. संजय राऊत नव्या राजकीय मार्गाच्या शोधात आहेत का? जाणून घ्या संपूर्ण राजकीय घडामोडी.
Sanjay Raut Crucial Role In  Thackeray Brothers Yuti :
Sanjay Raut being acknowledged during the event marking the political reunion of the Thackeray brothers.saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरून ठाकरेसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलीय. अशातच आता पक्षाचे फायरब्रँड नेते संजय राऊत पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यासाठी नवा मार्ग शोधत आहेत का? अशीही चर्चा रंगलीय...पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट..

शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून ठाकरेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. आदित्य़ ठाकरेंनी पवारांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदारांच्या बैठकीत खुद्द प्रियंका चुतर्वेदींनीही तोच सूर आळवल्याचं बोललं जातंय. आता या सर्व धुसफुशीत ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत चर्चेत आलेत. राऊत ठाकरेंचं नाव घेतात आणि प्रचार गांधींचा करतात, असा आरोप भाजपनं केलाय. तर राऊतांनी हे आरोप फेटाळून लावल्येत.

Sanjay Raut Crucial Role In  Thackeray Brothers Yuti :
Pune : पुण्यात खळबळ! लाच घेताना प्रांताधिकारी शिंदे यांना बेड्या, लिपिकही जाळ्यात; नेमकं काय घडलं?

महत्त्वाचं म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत राजकीय पेच निर्माण झालाय. अशातच आता भाजपनं ठाकरेसेनेत दोन गट पडल्याचा दावा केलाय... एकीकडे ठाकरेसेनेला राज्यसभेची जागा न मिळाल्यानं आदित्य ठाकरे नाराज असल्याचं म्हटलं जातंय....

एवढंच नाही तर प्रियंका चतुर्वेदींनीही राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे... मात्र ठाकरेसेनेकडे संख्याबळ नसल्यानं 2028 मध्ये राऊतांसाठी राज्यसभेचा मार्ग कठीण दिसतोय.. त्यातच आदित्य ठाकरेंच्या नाराजीमुळे राऊतांचा पत्ता कट होण्याची भीती असल्यानं पक्षाचे फायरब्रँड नेते राऊत नवा मार्ग शोधत आहेत का? अशीही चर्चा रंगलीय.. अशावेळी भाजपनं केलेला दावा पाहता आगामी काळात राज्यसभेसाठी संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार .की उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षनिष्ठा जपणार याकडं राज्याचं लक्ष लागलंय.

Sanjay Raut Crucial Role In  Thackeray Brothers Yuti :
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको, ती कोण? चर्चेनं महाराष्ट्रात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com